breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरमधील सिटी चौकाचे नाव बदलून झालं आता ‘भारत माता चौक’

एकीकडे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यापासून सुरू झालेलं राजकीय वादंग अद्यापही म्हणावं तसं शमलेलं नसताना, दुसरीकडे केंद्र सरकारच्या तेथील परिस्थतीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांना हळूहळू यश येत असल्याचे दिसत आहे. जम्मू-काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी केंद्र सरकारचे अनेक कायदे लागू झाले आहेत. याचबरोबर आता या ठिकाणच्या चौकांचं देखील नव्याने नामकरण केलं जात असल्याचं दिसत आहे.

जम्मू महापालिकेने तेथील ऐतिहासिक सिटी चौकाचे नाव बदलून ‘भारत माता चौक’ व सर्कुलर रोड चौकाचे नाव बदलून ‘अटलजी चौक’ असं केलं आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे अनेक स्थानिकांकडून स्वागत करण्यात आलं आहे, तर काहींनी यास विरोध देखील दर्शवला आहे.

भाजपा नेते व जम्मू महापालिकेच्या उप महापौर पोर्णिमा शर्मा यांनी म्हटले की, जवळपास चार महिने अगोदर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्यामध्ये जनतेच्या मागणीवरून सिटी चौकाचे नाव बदलून ‘भारत माता चौक’ करण्याची मागणी केली गेली होती. तो प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. त्यानुसार आता सिटी चौकाचे नाव बदलून ‘भारत माता चौक’ व सर्कुलर रोड चौकाचे नाव बदलून ‘अटलजी चौक’ करण्यात आले आहे.

जम्मू शहरातील ऐतिहासिक सिटी चौकात दरवर्षी १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी भारताचा तिरंगा ध्वज फडकवला जातो. भाजपा नेत्यांची अनेक वर्षांपासूनची या चौकाचे नाव ‘भारत माता चौक’ करण्याची मागणी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button