breaking-newsराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाने एका चकमकीत दोन दहतवाद्यांचा खात्मा केला. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून रात्री उशिरा या भागात सर्च ऑपरेशन सुरु होतं. त्यानंतर सकाळी दहशतवाद्यांची माहिती मिळाली. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या भागात अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे.

काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरु केली. संयुक्त पथकाकडून संशयित जागेला घेराव घातल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराला संयुक्त पथकाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आणि चकमक सुरु झाली. याभागात अद्यापही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button