breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

च-होली, डुडुळगावामध्ये होणार पीएमपीचे ‘पार्किंग’

पालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाकडून साडेचार एकर जागा हस्तांरित 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणा-या ‘पीएमपीएमएल’ परिवहन महामंडळाच्या आगारात बसेसला पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वत्र रस्त्यावरतीच शेकडो बसेस  पार्किंग कराव्या लागत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाने पीएमपी बस पार्किंगसाठी च-होलीतील 3.50 एकर आणि डूडूळगाव जकात नाक्याची 1 एकर अशी सुमारे साडेचार एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. 

पुणे महानगर परिवहन महामंडळ हे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही मनपाच्या हद्दीपासून 20 किमी क्षेत्रासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणारी कंपनी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करुन प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. वाढत्या बस संख्येमूळे सध्यस्थितीत परिवहन महामंडळाच्या आगारात बसेस पार्किंग करण्यास जागा उपलब्ध नाही. त्यामुळे शेकडो बसेस अनेक ठिकाणी रस्त्यावर पार्किंग कराव्या लागत आहेत. याबाबत पीएमपीकडून महापालिका आयुक्तांना पत्र देवून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात व वाढीव हद्दीत पीएमपी बस पार्किंगला जागा उपलब्ध करु देण्यात यावी, अशी मागणी परिवहन महामंडळाने केली होती.

दरम्यान,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात व वाढीव हद्दीत विकास योजनेमध्ये विविध ठिकाणी परिवहन महामंडळासाठी आरक्षणे दर्शविली आहेत. त्यानूसार च-होलीतील सर्व्हे नंबर 129,130 मधील 3.50 एकर आणि डुडुळगाव, जकात नाक्याची 1 एकर जागा अशा एकूण साडेचार एकर जागा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांना बस गाड्या उभ्या करण्यास 30 वर्षे कालावधीसाठी हस्तांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या आरक्षित असलेल्या जागेचा ताबा परिवहन महामंडळासाठी देण्यात यावा, असा आदेश भूमि व जिंदगी विभागाने कर संकलन कार्यालयास दिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button