breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘चोरीचा मामला’ पाच भाषांमध्ये निर्मिती होणारा पहिला मराठी चित्रपट

मुंबई – काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाच्या नावावर आता नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. मल्लाळम, तेलुगू, तमीळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये चित्रपटाची निर्मिती होणार असून, पाच भाषांमध्ये होणारा ‘चोरीचा मामला’ हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर प्रियदर्शन जाधवने “चोरीचा मामला” च्या सर्व मुख्य कलाकारांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ‘चोरीचा मामला 2’ मध्ये हे सर्व कलाकार दिसतील याची खात्री झाली असून त्यांच्यासोबत नवीन कोण कलाकार दिसणार का
याची मात्र अजून उत्सुकता आहे.

स्वरुप स्टुडिओज निर्मित एवरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमाळे यांनी ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट होती. एक प्रामाणिक चोर एका बंगल्यात चोरी करायला गेल्यावर कसा अडकत जातो याची धमाल गोष्ट या चित्रपटात होती.

गुंतवणून ठेवणारी पटकथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर या चित्रपटानं प्रेक्षकांची दाद मिळवली. आता मराठीची सीमा ओलांडून पाच वेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट तयार होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही निश्चितच अभिमानाची घटना आहे. दरम्यान, आता मराठीची सीमा ओलांडून पाच वेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट तयार होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही निश्चितच अभिमानाची घटना आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button