breaking-newsआंतरराष्टीय

चीनच्या स्टुडिओमध्ये ‘ती’ पहिल्यांदाच बातम्या द्यायला आली आणि…

बीजिंग : चीनच्या वृत्तसंस्थेने आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून चालणाऱ्या थ्रीडी ऍंकरला लॉन्च केलं आहे. ही थ्रीडी एँकर सामान्य माणसाप्रमाणेच शरिराची हालचाल करू शकते, तसंच बातमीप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव बदलू शकते. पत्रकाराचं रूप आणि चेहऱ्याच्या हावभावाचं क्लोनिंग करून चीनने जगातला पहिलाच थ्रीडी एँकर बनवला आहे. 

चीनची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार शिन्हुआ आणि चीनची टेक कंपनी सोगाऊ यांनी मिळून थ्रीडी एँकर बनवली आहे. या एँकरचं नाव शिन शिआओई ठेवण्यात आलं आहे. याआधी २०१८ साली शिन्हुआने पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटलिजन्स एँकरला जगासमोर आणलं होतं. त्यावेळी ४ टुडी एँकर बनवण्यात आले होते. 

चीनने लॉन्च केलेल्या या थ्रीडी एँकरचा एक व्हिडिओ वृत्तसंस्थेने ट्विटरवरून शेयर केला आहे. 

https://twitter.com/Sogou_Inc/status/1263385515862065152
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button