breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची नितेश राणेंची मागणी, शिवसेनेतर्फे स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन अखेर येत्या प्रजासत्ताकदिनी, 26 जानेवारी रोजी होणार आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी माहिती दिली. विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख समोर आल्यानंतर याच्या नामकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजप नेते नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही याचे स्वागत केले आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1340681634509680640

नितेश राणेंनी ट्विट केले होते की, सन्माननीय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे!

नितेश राणे यांच्या या मागणीचे स्वागत करत खासदार राऊत म्हणाले की, विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मागणी आधीपासूनच स्थानिक शिवसैनिक करत आहेत. राणेंच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी शिवसेनेचे सर्वच नेते पुढाकार घेत आहेत.

चिपी विमानतळाच्या नामकरणासाठी दोन दिग्गज नावांचा प्रस्ताव समोर आलाय. यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button