TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे

  •  विधानसभा निवडणुकांतील विजयाची पिंपरी-चिंचवडमध्ये होणार पुनरावृत्ती
  •  भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला विश्वास

पिंपरी । प्रतिनिधी
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’या संकल्पनेला देशातील सर्वसामान्य नागरिकांनी साथ दिली. त्यामुळे भाजपाचा झेंडा सर्व राज्यांत फडकत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. पंजाबमध्ये जनतेने काँग्रेसला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी, तर उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या चारही राज्यात भाजपाला मोठी आघाडी मिळाली आहे.
विकासाचे मुद्दे घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. त्याला सामान्य नागरिकांची साथ मिळत आहेत. लोकांना विकास आणि विश्वास हवा आहे. भाजपा धोरणानुसार आश्वासक विकास हाच निवडणुकांचा मुद्दा आहे. भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून देश भाजपामय होतोय, याचे समाधान वाटते, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

जोशुआ डिसोझांची लढत रोमहर्षक…
गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रांन्सिस डिसोझा यांच्या निधननंतर जोशुआ डिसोझा यांनी पोटनिवडणूक लढवली. वयाच्या तिशीमध्ये जोशुआ आमदार म्हणून गोवा विधानसभा सभागृहात नेतृत्त्व करु लागले. म्हापसा विधानसभा मतदार संघ आणि बोर्देझ तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय उलथापालथ झाली. दिग्गज नेते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यामुळे अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. निवडणुकीपूर्वी दोन महिने म्हापसामध्ये सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांची मोर्चेबांधणी केली. सर्वांनी ‘टीमवर्क’ केले. त्याला यश मिळाले. गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होत असताना माझा खारीचा वाटा राहील, याचे मनोमन समाधान आहे.

पिंपरी-चिंचवडची निवडणूक विकासाच्या मुद्यांवरच लढणार…
राज्यात भाजपामय वातावरण होत आहे. लोकांना विकासकामांवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यात रोल मॉडेल ठरतील, असे प्रकल्प उभारले आहेत. आता देशातील निवडणुकांचा कल पाहता आणि गोव्यातील अत्यंत चुरशीची लढत लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक भाजपाच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवताना दिसतात. पिंपरी-चिंचवडमध्येसुद्धा या निवडणुकांच्या निकालांचा सकारात्मक परिणाम दिसेल. आम्ही महापालिका निवडणुका केवळ विकासाच्या मुद्यांवरच लढवणार आहोत, असा दावाही आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे परफेक्ट नियोजन…करेक्ट कार्यक्रम…
गोवा सार्वत्रिक निवडणूक घोषणा झाल्यानंतर भाजपातील मोठा गट काँग्रेसमध्ये दाखल झाला. काँग्रेस, तृणमूल काँग्रे, मगोप आणि आम आदमी पार्टी अशी लढत झाली. या निवडणुकीत भाजपासह निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, ‘‘परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम…’’ या सूत्रानुसार, फडणवीस यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह गोव्याचा विजय सोपा केला. अन्य पक्षांत काही सदस्य आता भाजपाला पाठिंबा देणार आहेत. फडणवीस यांच्यासोबत अन्य राज्यात निवडणूक नियोजनात काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. अचूक नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास आव्हानात्मक परिस्थितीत यश मिळवता येते, हे शिकायला मिळाले. फडणवीसांच्या नेतृत्त्वाची चुणूक पुन्हा एकदा पहायला मिळाली, अशा भावनाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button