breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमुंबई

चिंताजनक! नवी मुंबईत ड्रग्स माफिया सक्रीय, ड्रग्सचा व्यापार वाढण्याची कारणं काय?

नवी मुंबई: गेल्या वर्षभरात नवी मुंबई हे अंमली पदार्थ व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून समोर येत आहे. जेएनपीटी बंदरामुळे मोठ्या प्रमाणात तस्करीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून नवी मुंबईत अंमली पदार्थाचा व्यापाराने जोर धरल्याचे दिसत आहे.

गांजा, चरस, अफीम, एमडी, कोकेनचा साठा जप्त होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. स्वातंत्रदिनाच्या पाच दिवसाअगोदर तर तब्बल 1 हजार कोटीचे अफीन, हिरॉईन जप्त करण्यात आलेलं आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. महत्वाचे म्हणजे कोविड काळात पोलीस इतर कारवाईमध्ये गुंतले असतांना ड्रग्स माफीया सक्रीय झालेले आहेत.

नवी मुंबईत शिकणाऱ्यासाठी येणारे नायजेरियन विद्यार्थी अंमली पदार्थांच्या व्यापारात सक्रीय आहेत. खारघर, तळोजा, घनसोली, पनवेल या भागात राहणाऱ्या नायजेरीयन लोकांची संख्या अलिकडच्या काळात वाढलेली आहे. गेल्या वर्षभरात अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या नायजेरीयन गँगमधील 30 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. 

नवी मुंबईत ड्रग्सचा व्यापार वाढण्याची कारणं?

  • नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात नायजेरीयन नागरिकांचे वास्तव्य
  • नायजेरीयन नागरिक ड्रग तस्करीत सक्रीय
  • जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून परदेशातून ड्रग्सची तस्करी
  • रस्तेमार्गे नवी मुंबईत अंमली पदार्थाचा पुरवठा
  • वर्षभरात गांजा, हिऱॉईन, अफूच्या तस्करीत वाढ
  • जेएनपीटीमुळे नवी मुंबईत ड्रग व्यापारी, तस्कर सक्रीय
  • एज्युकेशन हब असल्यामुळे तरुण ड्रग्सच्या जाळ्यात
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button