breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: नवी मुंबईत ‘मिशन झिरो’, महिन्याभरात 51 हजार अँटिजेन टेस्ट

नवी मुंबई: ‘मिशन ब्रेक द चेन’ व्दारे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून कोरोना बाधितांचा जलद शोध घेऊन त्यांच्यापासून होणारा संभाव्य प्रसार टाळण्याच्या दृष्टीने घरोघरी मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्यासोबतच अर्ध्या तासात रिपोर्ट प्राप्त होणाऱ्या अँटिजेन टेस्टिंगवर भर दिला जात आहे. 16 जुलैपासून मोफत अँटिजेन टेस्टिंग सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. त्यासाठी 22 अँटिजेन टेस्टिंग केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. तसेच सोसायटी, वसाहती याठिकाणी जाऊन अँटिजेन टेस्टिंग मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. याव्दारे 16 ऑगस्टपर्यंत एका महिन्यात 51 हजार 323 व्यक्तींची अँटिजेन टेस्ट करण्यात आलेली आहे 

22 ठिकाणी अँटिजेन टेस्टिंग केंद्रं सुरु करुनही अनेक व्यक्ती केंद्रावर जाऊन टेस्टिंग करण्याचे टाळताना दिसतात, हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘अँटिजेन टेस्ट आपल्या घरापर्यंत’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवलेली आहे. यासाठी ‘मिशन झिरो नवी मुंबई’ उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या अंतर्गत 6 जनजागृतीपर प्रचाररथ आणि 34 मोबाईल अँटिजेन टेस्टिंग व्हॅन कार्यान्वित करण्यात आल्या आणि सोसायटी, वसाहतींमध्ये जाऊन अँटिजेन टेस्ट्स करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

अँटिजेन टेस्टमध्ये ज्या नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळत आहेत, अशा व्यक्तींची लगेच आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करण्यात येत आहे. याशिवाय कोरोनाबाधित व्यक्तीच्या अतिनिकटच्या संपर्कातील व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व किडनीचे विकार असे इतर आजार असणाऱ्या कोमॉर्बिड व्यक्ती यांचीही आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे अशा व्यक्तींची आर.टी-पी.सी.आर. टेस्ट केल्यानंतर त्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त होईपर्यंत त्यांना विलगीकरण (Isolation) करून ठेवण्यात येत आहे. तशा प्रकारचे निर्देश 22 अँटिजेन टेस्ट केंद्र प्रमुखांना आणि रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची प्रतिदिन 1000 टेस्टिंग क्षमता असणारी अद्ययावत संपूर्ण ऑटोमॅटिक आर.टी.-पी.सी.आर. लॅब नेरुळ येथील महानगरपालिका रुग्णालयात कार्यान्वित झालेली असून येथून 24 तासांच्या आत रिपोर्ट देखील मिळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button