breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथीय लढवणार निवडणूक

जनहित लोकशाही पार्टीकडून हाॅटेल मॅनेंजमेंट पदवीधर नताशा लोंखडे उमेदवारी जाहीर

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांची तिकीटासाठी धावपळ सुरु आहे. मात्र, जनहित लोकशाही पार्टीतर्फे तृतीयपंथी असलेल्या नताशा लोंखडे यांनी चिंचवडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने एकच चर्चेला विषय बनला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. या मतदारसंघातील अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे नताशा लोखंडे यांनी सांगितले. आपल्याला उमेदवारी दिल्याचे जनहित लोकशाही पार्टीने जाहीर केले आहे.

चिंचवड मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. दोन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आता तिसऱ्या वेळीही विजय मिळवणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेनेकडून राहुल कलाटे रिंगणात उतरतील. तेव्हा मात्र लक्ष्मण जगताप यांच्यापुढे आव्हान निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इथे लढायलाही अनेक जण उत्सुक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button