breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये आई-मुलाची तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ; गुन्हा दाखल

  • तुला पाहून घेईल अशी धमकी आरोपी मुलाने आणि त्याच्या आई ने संबंधित तरुणीला दिली

एका तरुणाने तरुणीची कॉलर पकडत अश्लील शिवीगाळ केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. गंभीर बाब म्हणजे तरुणाच्या आईने देखील मुलाला साथ देत तरुणीला आणि तिच्या बहिणीला शिवीगाळ केली आहे. तसेच दोघींना पाहून घेतो म्हणून धमकी दिली आहे. याप्रकरणी स्वरुपा लोढा आणि आरोपी मुलगा दर्शन लोढावर गुन्हा दाखल करण्यात आला. २३ वर्षीय तरुणीने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपी मुलाला आणि आईला चिंचवड पोलिसांनी अटक केली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दर्शन लोढा याने चारचाकी गाडीला धडक दिली आहे असे म्हणून फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेतली. चावी घेतल्याची फिर्यादी यांनी विचारणा केली असता. आरोपी दर्शन लोढा याने अश्लील शिवीगाळ करत तू छपरी आहेस तुझ्यासारख्या थर्ड क्लास मुली खूप पहिल्या आहेत. अस म्हणत फिर्यादी तरुणीच्या टॉप (ड्रेस) च्या कॉलर ला पकडून जवळ ओढून घेत हाताला हिसका दिला.

तेवढ्यात दर्शन लोढा याची आई स्वरुपा हिने तरुणीला आणि त्यांच्या बहिणीला अश्लील शिवीगाळ केली आणि आम्ही कायदा ओळखतो आमचे पोलीस ठाण्यात आणि कोर्टात रोजचे येणं जाणं आहे. तू आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करशील त्या पलीकडे काय करणार. तेव्हा आम्ही दोघे तुला बघून घेऊ अशी धमकी फिर्यादी यांना दिली. घटनेनंतर आरोपी स्वरूपा हिने फिर्यादी यांचा रस्ता अडवला. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत असून आरोपी आई आणि मुलाला अटक करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button