breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबईतील काही हायप्रोफाईल हस्ती आणि त्यांना ड्रग पुरविणारे एनसीबीच्या रडारवर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईत २०० किलो ड्रग पकडण्यात आले होते. या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. एनसीबीने वांद्रे आणि चेंबूरमध्ये सोमवारी छापा टाकला होता. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झाची माजी व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून 200 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत नवाब मलिकांच्या जावयाचे नाव उघड झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एनसीबीकडून नवाब मलिक यांच्या जावयाला समन्स बजावण्यात आले आहे.

वाचा :-कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचे लग्न समीर खान यांच्याशी झाले आहे. समीर यांनी 200 किलो ड्रगमधील मुख्य आरोपी करन सजनानी याच्याकडून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. दोघांमध्ये गुगल पे वरून व्यवहार झाला होता. यामुळे एनसीबीला या दोघांमध्ये ड्रग खरेदी-विक्री झाल्याचा संशय आहे. याच्या चौकशीसाठी समीर खानला एनसीबीने बोलावले आहे. ड्रग प्रकरणावरून एनसीबीच्या रडावर अनेक जणआहेत. यामुळे आतापर्यंत बचावलेले बॉलिवूडकर तसेच राजकारणातील काही व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबीय ड्रग प्रकरणात समोर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचं प्रकरण ताजं असतानाच हा दुसरा धक्का राष्ट्रवादीला बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button