breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये अागीची घटना ; महिला जखमी

चिंचवड – चिंचवड गावातील केशवनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या कमला कॉर्नर या इमारतीत असणाऱ्या सदनिकेत आगीची घटना घडली. सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली.अचानक घडलेल्या या घटनेत एक महिला जखमी झाली.अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

कमला कॉर्नर मधील दुसऱ्या मजल्यावर सोळंखी कुटुंबीय राहतात.आगीची घटना घडली तेव्हा मंजू सोळंखी या घरात स्वयंपाक करून घरातील आवरा-आवर करत असताना अचानक स्वयंपाक घरातून धूर येऊ लागला. यावेळी घरातील सदस्यांनी आरडा-ओरडा केल्याने शेजारी असणारे काही जण धावत आले. या वेळी घरातील सर्वांना सुखरूप बाहेर काढले.स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर ने पेट घेतला.आगीच्या ज्वाला इतरत्र पसरल्याने आग वाढत गेली.घरातील फर्निचरला आगीने ओढल्याने घरात धुराचा कल्लोळ पसरला.इमारतीतील नागरिकांनी अग्निशामक दलाल घटनेची माहिती दिली.महापालिकेच्या नेहरूनगर व निगडीतील दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली.पेट घेतलेला गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. घराच्या खिडक्यांमधून धूर बाहेर येत होता.आगीची घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने काहीकाळ या भागात वाहतुक कोंडी झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button