breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

चाकणमधील उद्योगांचे चक्र सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी मदत : खासदार डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनामुळे सुरू असलेले लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना कामगार उपलब्ध करून देण्यासह विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (एफसीआय) समवेत आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. एका बाजूला लॉकडाऊन शिथिल करून कंपन्या सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील व परराज्यातील हजारो कामगार त्यांच्या घरी परत गेले. त्यामुळे कंपन्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. शिवाय सतत बदलणारा कन्टेन्मेंट झोन लक्षात घेता उपलब्ध कामगारांना कामावर येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, एमआयडीसी व कामगार उपायुक्त कार्यालय आदींकडून योग्य माहिती व मार्गदर्शन कंपन्यांना मिळावे.

तसेच त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांच्या पुढाकाराने आज फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या सदस्य कंपन्यांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, पुण्याचे कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, खेडचे प्रांत अधिकारी संजय तेली, एफसीआयचे दिलीप बटवाल, मोहन पाटील तसेच विविध कंपन्यांचे आदी उपस्थित होते. कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वच कंपनी प्रतिनिधींनी आनंद व्यक्त करताना त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button