breaking-newsक्रिडा

चहलचं बळींचं अर्धशतक; बुमराह, अश्विनला टाकलं मागे विक्रम

दीपक चहरने बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली. सामन्यात दीपक चहरने भेदक मारा केला. टी २० इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला.

सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमुद्दुलाहला त्रिफळाचीत करत युझवेंद्र चहलने आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीत ५० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा चहल भारताचा केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरला. या आधी रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह या भारतीय गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये ५० बळींचा टप्पा पार केला आहे. पण त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे चहलने सर्वात जलद बळींचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने केवळ ३४ टी २० सामन्यात ही कामगिरी केली. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वात जलद ५० बळी टिपणारा भारतीय गोलंदाज ठरला. तसेच जगात चौथ्या क्रमांकाचा सर्वात जलद ५० आंतरराष्ट्रीय टी २० बळी टिपणारा गोलंदाज ठरला.

BCCI✔@BCCI

👏
🙌

That moment when you pick up your 50th T20I wicket – @yuzi_chahal

He also becomes the fastest to 50 T20I wickets for India.

दरम्यान, भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोघे स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. राहुलने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तर युवा श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावा करत आपले पहिलेवहिले टी २० अर्धशतक झळकावले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button