राष्ट्रिय

चंद्रबाबू नायडु यांना सात दिवसांत निवासस्थान सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश सरकारने टीडीपीचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या निवासस्थानात पुन्हा ही नोटीस पाठवली आहे. या नोटिसमध्ये चंद्रबाबू नायडू यांनी सरकारी निवासस्थान सात दिवसात रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायडूंचा हा निवासस्थान अमरावतीच्या वांदावल्ली येथे कृष्णा नदीच्या काठावर आहे.

शनिवारी नायडू यांच्या निवासस्थानामध्ये आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एपीसीआरडीए) नोटीस पाठविली. माजी मुख्यमंत्री जमीनदार लिंगमनेनी रमेश यांच्या नावावर 19 सप्टेंबर रोजी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, घर रिकामे करण्याची नोटीस एपीसीआरडी कायद्याच्या कलम 115 (1) आणि 115(2) अंतर्गत देण्यात आली आहे. तळमजला, पहिला मजला जलतरण तलाव आणि ड्रेसिंग रूम इत्यादी यामध्ये बांधल्या गेलेल्या असून संबंधित अधिकाऱ्यांसाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यात म्हटले आहे की, हे गृहनिर्माण संकुल रिकामे न केल्यास एपीसीआरडीए त्यावर कारवाईस प्रारंभ करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button