breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

मुंबई – घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालयात परिसरात चार्टर्ड विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर स्फोटाचा आवाज झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विमान कोसळलं त्यावेळी वैमानिकासह 4 जण विमानात होते.  पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. विमानातील या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर लवकुश कुमार (वय 21 वर्ष) व नरेश कुमार निशाद (वय 24 वर्ष) हे दोन तरुण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त विमान उत्तर प्रदेश सरकारचे होते. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या विमानाची 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनकडे विक्री केली होती. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का? हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती. त्याच वेळी ही दुर्घटना घडली.

घाटकोपर पश्चिम परिसरात जागृती पार्क परिसरात जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हे चार्टर्ड विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. येथून विमानतळ जवळ असून लहान हेलिकॉप्टरचं प्रशिक्षण देण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. तसंच चार्टर्ड विमानांचाही हा मार्ग असल्याची माहिती आहे. घाटकोपरमधील सर्वोदय रुग्णालयाजवळील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या  इमारतीत हे विमान कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

या अपघातात महिला वैमानिकासह इतर तिघांचा मृत्यू झाला असला तरी वैमानिकाच्या प्रसंगावधानानं हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजल्यानंतर वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत गर्दीच्या ठिकाणावरून विमान जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या मोकळ्या ठिकाणी वळवलं आणि तिथेच ते लँडिंग करत असताना कोसळलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button