breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ म्हणतात… ‘ती’ आली ती आमदारकी घेवूनच!

कोल्हापूर । प्रतिनिधी

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची जनतेसोबत संवाद साधण्याची शैली अगदीच वेगळी आहे. त्याचप्रमाणे जनता दरबारात एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवण्याचा त्यांचा पॅटर्न देखील वेगळा आहे. हसन मुश्रीफ हे पाचव्यांदा कागलकरांचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे यंदाच्या मंत्री पदासोबत दांडगा अनुभव देखील त्यांच्यासोबत आहे. त्याचप्रमाणे पहिल्या निवडणुकीपासून ते आतपर्यंत त्यांच्या सोबत असलेली ९०० क्रमांकाची गाडी देखील त्यांच्या सोबत आहे.

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहेत. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्याच वर्षी हसन मुश्रीफ यांनी विधानसभा लढवली आणि ते जिंकून देखील आले.यापूर्वी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद आणि सभापती पदाचा चांगला अनुभव होता.

विजय निवडणुकीपूर्वी मुश्रीफ कुटुंबामध्ये ९०० क्रमांकाची ही गाडी आली होती. या या गाडीच्या आगमनाने जणू मुश्रीफ कुटुंबाच्या विजयाचा मार्गच खुला झाला. म्हणून यानंतर कुटुंबात जेव्हढ्या गाड्या आल्या त्या सर्वांवर ९०० हाच क्रमांक दिसला.त्यामुळे ही ९०० क्रमांकाची चारचाकी थेट आमदारकी घेऊनच आल्यासारखी मुश्रीफ यांना वाटते.

आज गावागावातील उमेदवार ९०० क्रमांक पाहताच आमदार साहेबांची गाडी म्हणून ओळखतो. आज मंत्री पद असताना देखील मुश्रीफ यांचा जनसंपर्क दांडगा आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतर देखील हसन मुश्रीफ तितक्याच तत्परतेने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी धावून जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button