breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गो एअर विमान कंपनी आजपासून सुरू करणार १०० देशांतर्गत उड्डाणे

प्रवाश्यांच्या खिश्याला परवडेल आशा किंमतीत विमान सेवा देणारी गो एअर कंपनीने अनेक नवीन उड्डाण सेवा सुरू केल्या आहेत. गो एअर विमान कंपनी १०० शहरांसाठी देशांतर्गत विमान सेवा सुरू करणार आहे.मुंबई, दिल्ली, बेंगलुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे, लखनऊ, नागपूर, वाराणसी, जयपूर, पटना, रांची, गुवाहाटी, चंदीगड, श्रीनगर, लेह आणि जम्मू यांसरख्या अन्य शहरांमध्ये दखील ही कंपनी विमान सेवा देणार आहे.

येत्या २१ सप्टेंबर पर्यंत गो एअर विमान कंपनीची परिचालन क्षमता ४५ टक्क्यांवर येईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. त्याचप्रमामे १५ ऑक्टोबरपर्यंत क्षमतेमध्ये वाढ होवून ६० टक्क्यांवर पोहोचेल असं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.गो एअर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सांगण्यानुसार देशांतर्गत विमान प्रवासाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक राज्यांनी प्रवासावरील बंदी उचलल्यानंतर त्यात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाची गेष्ट म्हणजे ५ सप्टेंबरपासून विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कोणतेही उड्डाण रद्द केले जाणार नाहीत. किंबहूना विमान सेवा रद्द करण्याची वेळ आली तर प्रवाश्यांचे पैसे परत केले जातील असं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईपासुन दिल्ली पर्यंत दररोज दोन उड्डाणे आसणार आहे. तर मुंबईपासुन अहमदाबाद, चेन्नई, नागपूर, पटना, रांची, वाराणसी आणि जयपूर पर्यंत दिवसाला एक उड्डाण असणार आहे. विमान कंपनी मुंबई ते लखनऊला आठवड्यातून चार उड्डाण भरणाार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button