breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गेल्या २४ तासात ६ हजार ५३५ रुग्णांची नोंद, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४५ हजार ३८० रुग्ण

मुंबई | देशात गेल्या २४ तासात ६ हजार ५३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ३८० झाली असून मृतांचा आकडा ४ हजार १६७ वर पोहोचली आहे. तसेच ६० हजार ४९१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. राज्यात काल (२५ मे) १ हजार १८६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ हजार ६६७ झाला आहे. त्यातील १५ हजार ७८६ बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर १ हजार ६९५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत ३१ हजार ९७२ कोरोनाबाधित आहे. तर ०२६ बळी गेले आहेत. दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ हजारावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत दिल्लीत २७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राजस्थानमध्ये रुग्णांची एकूण संख्या ७ हजार ३०० वर गेली आहे. तर १६७ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात कोरनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button