breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

गुगलची मक्तेदारी संपवण्यासाठी अॅपल आणणार सर्च इंजिन

सर्च इंजिनमधील गुगलच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी अॅपल आता स्वत:चे सर्च इंजिन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. कोयवोल्फने दिलेल्या वृत्तामध्ये हा दावा करण्यात आला आहे. गुगलला पर्याय म्हणून अॅपल हे सुरुवातीला स्वत:च्या डिव्हाइसमध्ये सुरू करणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इंजिनिअर्सची भरती केली जात आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी २३ जूनला वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये अॅपल आता सिलिकॉन चिप्सवर काम करणार असल्याच्या विधानाद्वारे याचे संकेत दिले आहेत. आयफोन, आयपॅड आणि मॅक ओएसमध्ये डिफॉल्ट सर्च इंजिन ठेवण्यासाठी गुगलकडून अॅपलला दरवर्षाला कोट्यवधी रुपये दिले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, हा करार लवकरच संपुष्टात येऊ शकतो. यूके कॉम्पिटिशन अँड मार्केट अॅथॉरिटी अॅपल व गुगलच्या सर्च इंजिन कराराबाबत कठोर भूमिका घेऊ शकते. वृत्तानुसार, अॅपलचे शेअर मार्केट जगात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे गुगल सर्च डिफॉल्ट असल्याने दुसऱ्या सर्च इंजिनला संधी मिळत नाही, असे अॅथॉरिटीचे म्हणणे आहे. यासाठीच अॅपल स्वत:च्या सर्च इंजिनवर काम करत आहे. याहू आणि बिंगही सर्च इंजिनची सेवा देतात. मात्र, गुगलसमोर या दोन्ही कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. यामुळे अॅपलकडून सर्च इंजिन आणले गेल्यास गुगलला थेट आव्हान मिळेल. कारण अॅपलचे आधीपासूनच जगभरात प्रचंड ग्राहक आहेत.

कोयवोल्फच्या वृत्तानुसार सुरुवातीला अॅपलच्या सर्च इंजिनमध्ये नोकरी व स्पॉटलाइटच सर्च करता येईल. सर्च इंजिन फोनमध्ये गुगल असिस्टंटप्रमाणे काम करेल. मात्र, तो पूर्णपणे प्रायव्हेट असेल. ते तुम्हाला आयओएस कॉन्टॅक्ट्स, डाॅक्युमेंट, ईमेल, इव्हेंट्स, फाइल, मेसेज, नोट आदींच्या आधारे प्राप्त होईल. वृत्तात दावा करण्यात आला आहे की, आयओएस १४ आणि आयपॅडओएस १४ बीटा व्हर्जनमध्ये कंपनीने गुगल सर्चला बायपास केले आहे. तसेच अॅपलबोटलादेखील नुकतेच अपडेट करण्यात आले. अॅपलबोट कंपनीचीच एक क्रॉलिंग साइट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button