breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘गिरीश काय रे?, अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही’, पुण्यात बॅनरबाजी

पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट असतानाच शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात बॅनरबाजी सुरु झाली आहे. ‘गिरीष काय रे?, दुष्काळ असताना देखील अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही’, असा मजकूर असलेले बॅनर शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आले आहे. हे बॅनर कोणी लावले आहेत, हे अद्याप अस्पष्ट असले तरी हे बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्लूआरआरए) आदेशानुसार पाणीकपात करण्याबाबत गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून महापालिका वाढीव लोकसंख्येबाबत आराखडा तयार करत असल्याने पाण्याबाबत आठवडाभरात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

शहरात पाणीकपात निश्चित असली तरी नेमकी किती टक्के पाणीकपात होणार हे अजून अस्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका करणारे बॅनर लावण्यात आले आहे.’गिरीष काय रे?, दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही. तू तर आपल्या शहरातला ना?, पाणी कुठं मुरतंय?’, असा मजकूर या बॅनरवर आहे. बॅनरखाली एक त्रस्त पुणेकर नागरिक असे लिहिण्यात आले आहे.

हे बॅनर कोणी लावले आहेत, या मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर एक फलक लावण्यात आला होता. यामध्ये हो, मी पीडित आहे. #Metoo… असा मजकूर होता. ‘#Metoo…गेली कित्येक दशकं माझ्या संमतीशिवाय होत अलंय, कधी माझ्या गर्भातून वाळू उपसा तर कधी घराघरातील सांडपाणी, कधी निर्माल्याच्या रूपात कचरा तर कधी असभ्य, असंस्कृतांची मनमानी’, असे यात म्हटले होते. पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नद्यांबाबत हा फलक लावण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button