breaking-newsक्रिडा

गालाघर, सायबेज संघांची आगेकुच

  • 15वी अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा

पुणे- गालाघर संघाने ऍटॉस्‌ संघाचा तर सायबेज संघाने टाटा टेक्‍नोलॅजीज्‌ संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात निखिल भुजबळच्या नाबाद 76 धावांच्या बळावर गालाघर संघाने ऍटॉस्‌ संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ऍटॉस्‌ संघाने 20 षटकात 5 बाद 167 धावा केल्या. यात महेश भोसलेने नाबाद 43 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 167 धावांचे लक्ष निखिल भुजबळच्या नाबाद 76 धावांसह गालाघर संघाने 18 षटकात 5 बाद 169 धावा करून सहज पुर्ण केले. गौरव बाजपैने नाबाद 45 धावा करून निखिलला सुरेख साथ दिली. नाबाद 76 धावा करणारा निखिल भुजबळ सामनावीर ठरला.

दुसऱ्या सामन्यात हर्षल वाडकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सायबेज संघाने टाटा टेक्‍नोलॅजीज्‌ संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टाटा टेक्‍नोलॅजीज्‌ संघाने 20 षटकात 8 बाद 134 धावा केल्या. यात राकेश वाल्मिकीने 40 व कुमार वाल्हेकरने 35 धावा केल्या. हर्षल वाडकर व अभिषेक गोसावी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. 134 धावांचे लक्ष प्रतिक पंडितच्या 36, संकेत ऐकलच्या नाबाद 33 व अविनाश माळीच्या नाबाद 32 धावांसह सायबेज संघाने 18.4 षटकात 4 बाद 135 धावा करून पुर्ण केले. 24 धावांत 3 गडी बाद करणारा हर्षल वाडकर सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल –
साखळी फेरी –
ऍटॉस्‌ – 20 षटकांत 5 बाद 167 (संदिप भागवत 21, विशाल स्लाथीया 22, वौभव पेडणेकर 30, महेश भोसले नाबाद 43, सुमेध मन्वर 21, शुबेंदू पांडे 2-27) पराभूत वि गालाघर- 18 षटकांत 5 बाद 169 (निखिल भुजबळ नाबाद 76, शुबेंदू पांडे 22, गौरव बाजपै नाबाद 45, मंगेश सांगोडकर 3-14).

टाटा टेक्‍नोलॅजीज्‌ – 20 षटकांत 8 बाद 134 (राकेश वाल्मिकी 40, कुमार वाल्हेकर 35, हर्षल वाडकर 3-24, अभिषेक गोसावी 3-24) पराभूत वि सायबेज- 18.4 षटकांत 4 बाद 135 (प्रतिक पंडित 36, संकेत ऐकल नाबाद 33, अविनाश माळी नाबाद 32, राकेश वाल्मिकी 2-17).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button