breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासाला वेग आल्याचे दिसत आहे. सुशांतच्या वांद्र्यातील घरी स्पॉट चौकशीसाठी पाटणा पोलीस जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत सुशांतच्या बहिणीचं भांडण झालेलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.
सुशांतचा नोकर दीपेश मिरिंडा आणि गार्ड यांची काल चौकशी झालेली होती. दीपेशकडून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे. सुशांतचा मित्र परिवार आणि बहिणीचाही पाटणा पोलीस जबाब घेणार आहेत. याचं कारण म्हणजे रिया चक्रवर्तीसोबत सुशांतच्या बहिणीचं भांडण झालेलं होतं, अशी माहिती जबाबातून समोर आलेली आहे.