breaking-newsमुंबई

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शाळांना पत्रे व इतर पूरक साहित्याचे वाटप

रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शाळांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भेट दिली आणि आपदग्रस्त शाळांच्या व्यवस्थापनाकडे पत्रे व इतर पूरक साहित्य सुपूर्द केले.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने आपदग्रस्त शाळांना पत्रे व इतर पूरक साहित्य वाटप करण्यासाठी आज वेल्फेअर ट्रस्टच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे या मुरुड – नांदगाव येथे आल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला होता. शिवाय ज्या शेतकऱ्यांचे व शाळांचे नुकसान झाले त्यांना तातडीने मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर या शाळेला पत्रे व इतर पूरक साहित्य राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आले.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील आपदग्रस्त ७५ शाळांना लोखंडी पत्रे, ढापे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात त्यांच्यासमवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्याच्या विधी व न्याय राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button