breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

खासदार अमोल कोल्हे यांनी 99.60 टक्के गुण मिळवणा-या ऋतुजाचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

आमलेवाडी बोतार्डे येथील ऋतुजा प्रकाश आमले हिचे शैक्षणिक पालकत्व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारले आहे. ऋतुजाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 99.60 टक्के गुण मिळविले आहेत. तिला डॉक्टर व्हायचे आहे, त्यासाठी खासदार कोल्हे मदत करणार आहेत.

अमोल कोल्हे यांनी या विद्यार्थिनीला डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. तसंच ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने तिला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला.

जुन्नर तालुक्यातील आदिवासी ‘पेसा’ क्षेत्रातील आमलेवाडी बोतार्डे येथील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर 99.99 टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार 99.60 टक्के गुण मिळवून पहिलं स्वप्नं पूर्ण केले.

अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजाच्या पंखास बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल घेऊन अमोल कोल्हे यांनी आपल्या ‘जगदंब प्रतिष्ठान’चे सदस्य ऋतुजाच्या घरी पाठवले. या कार्यकर्त्यांच्या हस्ते ऋतुजाला ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा अॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला. तसेच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button