breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराष्ट्रिय

खडकीच्या हॉटेल ‘बब्बी दा ढाबा’मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड

पुणे – पुण्यात खडकी येथे पोलिसांनी सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. हॉटेल ‘बब्बी दा ढाबा’मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. देहविक्री करणाऱ्या परप्रांतातील दोन तरुणींची पोलिसांनी सूटका केली आहे. दौंड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून दोघे फरार झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, खडकी येथील हॉटेल बब्बी दा ढाबा येथ परप्रांतातील तरुणींकडून देहविक्री केली जात असल्याची गोपनिय माहिती दौंड पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. हॉटेल मॅनेजर आनंद मारोती बोगा (रा. भिवंडी, ठाणे) याला अटक केली आहे. तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी मुंबई आणि कोलकाता येथून आणलेल्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. दोन्ही तरुणींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button