breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
खडकवासला धरणातील विसर्ग २ हजार ५६८ क्युसेकपर्यंत कमी !
पुणे | प्रतिनिधी
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने मुठा नदीपात्रात केला जाणारा विसर्ग २ हजार ५६८ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे नदीपात्रातील रस्त्यासह बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला असेल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
खडकवासला धरणातील विसर्ग २ हजार ५६८ क्युसेकपर्यंत कमी !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 17, 2020
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने मुठा नदीपात्रात केला जाणारा विसर्ग २ हजार ५६८ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे नदीपात्रातील रस्त्यासह बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला असेल.