breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खंडणीखोरांच्या तावडीतून पाच वर्षाच्या मुलाची सुटका; वाकड पोलिसांचा सन्मान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पाच लाखाच्या खंडणीसाठी पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणा-या खंडणीखोरांच्या मुसक्या आवळून मुलाची सुखरूप सुटका केल्याने वाकड पोलिसांचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

थेरगाव येथील सुफियान रविवारी दुपारी पार्किंगमध्ये खेळत असताना तिथे त्याला एकाने “आ सुफियान गाडी में बैठ” असे म्हणत त्याला पळवून नेले. या घटनेची वरीष्ठ पोलीस निरिक्षक सतीश माने यांनी गांभीर्याने दखल घेत 60 पोलिसांची वेगवेगळी पथके नेमली. कर्तव्यतत्परता दाखवून पोलिसांनी शिताफीने खंडणीखोरांच्या मुसक्या आवळून मुलाला सुखरूप त्याच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले. वाकड पोलिसांनी कार्यतत्परतेने हे यश प्राप्त केल्याने त्यांचा सामाजिक स्तरातून गौरव होत आहे.

सुफियान घरी आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आनंदाने दिवाळी सण साजरा केला. ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मराठा सेवा संघ संभाजी  ब्रिगेडच्या वतीने वाकड पोलीस, स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सतीश माने, पोलीस निरिक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश स्वामी, पोलीस उपनिरिक्षक हरीष माने, हेमंत हांगे, सुदर्श कापरे, बापुसाहेब धुमाळ, विभीषण कन्हेरकर, तानाजी भोगाम व त्याच्या सहकार्यांचा राष्ट्रमाता जिजाऊंची  प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे पुणे जिल्ह्याचे प्रकाश जाधव, संभाजी  ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, शहर कार्याध्यक्ष वैभव जाधव, ज्ञानदेव लोभे, अशोक शेंडगे आदी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button