breaking-newsपिंपरी / चिंचवड

क्वींस्टाऊन हाउसिंग सोसायटीकडून डी. वाय. पाटील रुग्णालयाला पीपीई किटचे वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड येथील क्वींस्टाऊन हाऊसिंग सोसायटीच्या सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल करता 200 पीपीई कीट आणि सेनीटायझर याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर उपस्थित होते. त्यांच्यासमवेत डॉ. मिलिंद पटवेकर, डॉ. मीनल पटवेकर आणि सोसायटीचे चेअरमन सुजित पाटील सेक्रेटरी शिरीष पोरेडी खजिनदार वडाळकर आणि मॅनेजिंग कमिटीचे व सोशल फाउंडेशन चे सभासद उपस्थित होते.

सोसायटी सोशल फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना सारख्या महामारीवर मात करण्याकरता सोसायटीच्या वतीने सोशल फाउंडेशनची निर्मिती करून फाउंडेशनच्या वतीने सोसायटीमध्ये मावळ तालुका खेड तालुका आणि मुळशी तालुका या तीनही तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयामध्ये जाऊन पीपीई किटचे वाटप करण्यात आले तसेच सोसायटी मधील गरीब कामगारांना आणि सोसायटीच्या परिसरातील गरीब रहिवाशांना रेशनिंग चे वाटप (550 कुटुंबांसाठी) करण्यात आले याबाबत सोसायटीचे चेअरमन सुजित पाटील यांनी सविस्तर माहिती. आपण कोरोना सारख्या महामारी वर मात करण्याकरता प्रयत्न करावेत अशा सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोसायटीच्या वतीने बबनराव भोसले, विजयराव गोपाळे, मल्लिनाथ कलशेट्टी, जाजू, शीतीज शर्मा, रविकिरण केसरकर, शिवा, आत्माराम गोरे, रमेश धारिवाल, प्रफुल पारेख, सुमित पुंगलिया आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते. सोसायटीचे चेअरमन सुजित पाटील यांनी भविष्यामध्ये ही सोसायटीच्या सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याचप्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि ग्रामीण भागांमध्ये असणाऱ्या सर्व दवाखान्यांना अजूनही सहकार्य करण्याचे जाहीर केले .

त्यानंतर अधिष्ठाता डॉ. भवाळकर यांनी सोसायटीच्या सोशल फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वायसीएम हॉस्पिटल हे कोविड रुग्णांवर उपचार करीत आहे तर नॉन कोविड रुग्णांवर डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल सेवा देत आहे. त्यामुळे डी वाय पाटील हॉस्पिटल वर आलेला रुग्णांचा ताण पाहाता आमच्या हॉस्पिटला आपण केलेल्या मदतीबद्दल त्यांनी सोसायटीचे शतशः आभार मानून सोसायटीला धन्यवाद दिले.

सोसायटीचे सेक्रेटरी शिरीष पोरेडी यांनी सर्वांचे आभार मानले आणि सुरेश गारगोटे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button