breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राहुल गांधीच्या केंब्रिजमधील ‘त्या’ वक्तव्यावरून उपराष्ट्रपती भडकले

देशाचा अपमान सहन केला जाणार नाही

दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशातुन भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राहुल गांधींवर भडकले आहेत. भारताच्या लोकसभेत माईक बंद केला जातो हे इथल्या खासदाराने विदेशात जाऊन सांगने हा देशाचा अपमान आहे, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.

भारताकडे G20 चं अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे अशावेळी भारताला एक खासदार विदेशात जाऊन भारतावर टीका करत असेल, देशाचा अपमान करत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.

सध्या आपला देश अमृत काळात आहे. लगळे भारतीय यामुळे आनंदात आहेत. आपण अशा काळात असताना देशातला एक खासदार देशाच्या विरोधात बोलतो ते देखील बाहेरच्या देशात जाऊन. हे कितीतरी दु:खद आणि दुर्दैवी आहे. समृद्ध लोकशाही मूल्यांचं हे हनन आहे, असंही उपराष्ट्रपती म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसंच नरेंद्र मोदी हे एक विशिष्ट अजेंडा चालवत आहेत आणि त्याकडे देशाला घेऊन जात आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button