breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरेवर आयुक्तांची दंडात्मक कारवाई

– उपलेखापाल राजश्री देशपांडेवर एक वेतनवाढ स्थगित

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे व उपलेखापाल राजश्री देशपांडे यांनी पर्यवेक्षकीय कामकाजावर अक्षम्य दुर्लक्ष करत आर्थिंक बाबींवर प्रभावी नियंत्रणाचा अभाव असल्याने पर्यवेक्षकीय नियंत्रणात कुचराई केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी पानसरेवर पाचशे रुपये दंडात्मक तर देशपांडेवर एक वेतनवाढ स्थगित करण्याचा आदेश दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातील क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आणि उपलेखापाल राजश्री देशपांडे हे जबाबदारी पदावर कार्यरत आहेत. क्रीडा विभागाच्या प्रशासन अधिका-यांच्या अनुउपस्थितीत कार्यरत कर्मचा-याकडून कामकाज करुन घेणे, त्यांचेवर देखरेख ठेवणेचे पर्यवेक्षकीय कामकाज सोपविण्यात आलेले होते. तर देशपांडे यांना आर्थिंक बाबीविषयक कामकाजावर संपुर्ण नियंत्रण ठेवणेचे महत्वाचे कामकाज सोपविण्यात आलेले होते.

परंतू, क्रीडा विभागातील लिपिक विशाल डाबेराव यांनी 3 लाख 28 हजार 800 इतक्या रकमेचा अपहार केल्याचे आढळून आले. या प्रकरणाची संपुर्ण चैाकशी केल्यानंतर त्रिसदस्यीय चैाकशी समिती नियुक्ती करुन त्यांनी अहवाल सादर केला. वाहन इंधन प्रतिपुर्ती कामकाजात आर्थिंक अपहारास डाबेराव प्रथमदर्शनी जबाबदार असले तरी आर्थिंक नियमितता आढळून आलेली आहे. बहुतांश बिलावर वाहन क्रमांक, इंधन परिणाण नमुद नाही. त्यामुळे इंधन दर बिलाची रक्कमेत तफावत असतानाही पडताळणी न करणे, प्रतिपुर्तीकरिता बिले सादर करुन त्यास मंजुरी दिलेली आहे. अशा त्रुटी तपासणी निदर्शनास आल्या.

दरम्यान, आर्थिक अपहार करणेस पोषक व समर्थनीय कामकाज प्रणाली राबविणेस आल्या. त्यास क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आणि उपलेखापाल राजश्री देशपांडे यांनी पर्यवेक्षीय कामकाजावर अक्षम्य दुर्लक्ष केले. त्याना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला. तसेच विभाग प्रमुखांनी केलेल्या शिफारशीनुसार कर्तव्यास कसूर करुन महाराष्ट्र नागरी सेवेचा भंग केला आहे.  त्यामुळे उपलेखापाल राजश्री देशपांडे यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात रोखून ठेवण्यात आली तर क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांना पाचशे रुपये दंडात्मक शास्ती कारवाई करण्यात आली आहे. सदरील दंडात्मक रक्कम मासिक वेतनातून वसुल करणेत यावी, तसेच सक्त ताकीदही देण्यात आली आहे. सदरील आदेशाची नोंद संबंधिताच्या सेवा नोंद पुस्तकांत घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button