breaking-newsक्रिडा

कोहलीला अजूनही शांत ठेवता येते, त्याला वरचढ होऊ देऊ नका- पॉंटींग

अडलेड- सध्या जबरदस्त लयीत असलेल्या विराट कोहलीवर धावांसाठी झगडण्याची वेळ आणता येऊ शकते, त्याला मोकळीक देऊन त्याचा सर्वोत्तम खेळ करण्याची संधी देऊन फक्त बघत बसू नका असा सल्ला ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी माजी कर्णधार रिकी पॉंटीग याने ऑस्ट्रेलियाने संघाला दिला आहे.

भारत अंडी ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासूनचार कसोटी सामन्यांचे मालिका खेळवली जाणार आहे. त्याबाबत पॉंटीगने मुलाखत दिली आणि यात तो पुढे म्हणाला, विराटवर कुरघोडी करता येते. मी याआधी तसे झालेले पहिले आहे. किमान तुम्ही तास प्रयन्त तरी करायला हवा . मिचेल जॉन्सन काही वेळा ते विराटला वरचढ ठरला होता. त्याने विराटची एकाग्रता भंग करून त्याला बाद केले आहे. त्यासाठी कधी त्याने गोलंदाजील वेगवान मारा अवलंबला तर कधी बाचाबाची करूनही आपल्याला हवे ते मिळवले. त्यामुळे त्याला मोकळीक देऊन मागे बसून खेळ पाहण्यात मजा नाही

पुढे बोलताना पॉंटींग म्हणाला, ऑस्ट्रेलियाची क्रिकेट खेळण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यात घरच्या मैदानावर तर आमचा वावर आणखी आत्मविश्वासपूर्ण असतो. ते त्यांच्याकडे पहिले तरी त्यांच्या हालचालीवरून दिसते. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाने आक्रमक खेळ कारवाकी नाही यावर अनेक ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूंमध्ये वाद होत आहेत. आक्रमकतेशिवाय खेळणे मूर्खपणा आहे. परंतु, त्याला उत्तम गोलंदाजीची जोड असते. जर चांगली कामगिरी न करता फक्त शाब्दिक आक्रमकता दाखवली तर तो देखील मूर्खपणा ठरेल, असेही त्याने या वेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button