breaking-newsक्रिडा

कोहलीचा त्रिफळा उडवणारा ‘रशीद’ पहिला लेगस्पिनर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा त्रिफळा उडवणारा इंग्लंडचा आदिल रशीद हा पहिला लेगस्पिनर ठरला आहे. कोहली तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगलाच फॉर्ममध्ये होता. तो आज शतक ठोकणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण 71 धावांवर खेळत असताना आदिल रशीदनं त्याचा त्रिफळा उडवला.

रशीदनं टाकलेला तो चेंडू अप्रतिम होता. त्रिफळा उडाल्यानंतर कोहलीनेही या चेंडूवर आश्‍चर्य व्यक्‍त केले. कोहलीनं एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत 203 डाव खेळले आहेत. पण एका लेगस्पिनरने पहिल्यांदाच त्याचा त्रिफळा उडवला आहे. सामन्यानंतर कोहलीनंही रशीदचे कौतुक केले. रशीदनं फेकलेला तो चेंडू खूपच अप्रतिम होता, असं तो म्हणाला.

कोहलीच्या रूपाने भारताला चौथा झटका मिळाला होता. तो बाद झाल्यानंतर भारताचा डाव सावरलाच नाही. कोहली बाद झाला त्यावेळी भारताच्या 30.1 षटकांत 156 धावा झाल्या होत्या. पुढील 20 षटकांत भारतीय फलंदाजांनी केवळ 100 धावाच केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button