breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोविड काळातील खरेदीची चाैकशी करुन दोषीवर कारवाई करा; वंचित बहूजन आघाडीची मागणी

महापालिकेच्या गेटसमोर बेमुदत चक्री उपोषण सुरु

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून विविध साधन सामुग्रीची खरेदी करण्यात आली. त्यात अव्वाच्या सव्वा दराने थेट खरेदी देखील करण्यात आलीय. तसेच रुग्णालयातील अपुरा ऑक्सिजन व ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे रुग्णालयात 8 ते 10 रुग्णांचे मृत्यु झाले आहेत. या सर्व प्रकरणाची चाैकशी करुन दोषीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर उपोषण करण्यात येत आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात कारवाई होईपर्यंत दररोज सकाळी 9 ते 6 या वेळेत बेमुदत चक्री उपोषण करण्याचा इशारा तायडे यांनी दिला आहे.

1 ऑगस्ट 2020 पासून शहरातील सर्व “कोविड केअर सेंटर”खासगी संस्थांना अव्वाच्या सव्वा दरात चालवायला देण्यात आली आहेत. मुळात हे सर्व सेंटर 31 जुलै पर्यंत नागरिकांची कुठलीही तक्रार न येता पालिकेने अत्यंत उत्तमरित्या चालवली असताना हे सेंटर्स खासगी संस्थांना देण्यात आले.

हे सर्व सेंटर्स महापालिकेने खासगी संस्थांकडून काढून घेऊन पुन्हा स्वतः चालवावीत. आर्थिक गैरव्यवहारात सामील असणारे व ज्यांच्यावर चौकशी सुरू आहे असे वैद्यकीय विभागाचे मुख्य अधिकारी, बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता यांचे तात्काळ निलंबन करावे. वैद्यकीय विभागात खासगी तत्वावर कामावर असणाऱ्या सर्व कामगारांना त्यांचे लॉकडाउन काळातील मार्च ते मे या तिन्ही महिन्यांचे संपूर्ण मानधन देण्यात यावे. या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा 50 लाखाचा विमा काढण्यात यावा, आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत महापालिकेच्या वतीने मानधनावर घेण्यात आलेल्या सर्व आशा सेविकांना कायम करण्यात यावे. माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ शैक्षणिक टॅबचे वाटप करण्यात यावे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय कोविड समर्पित रुग्णालयाच्या धर्तीवर स्थानिकांना इतर आजारांवर मोफत, रास्त व दर्जेदार उपचार मिळावेत.

यासाठी तात्काळ डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाबरोबर करार करण्यात यावा. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अपुरा ऑक्सिजन व ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे रुग्णालयात 8 ते 10 रुग्णांचे मृत्यु झाले आहेत. या संदर्भात दोषी असणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक, अधिकारी यांचे निलंबन करून कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले असल्याचे तायडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button