breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूर महापालिका निवडणूक; प्रभाग आरक्षण सोडत जाहीर

कोल्हापूर |महाईन्यूज|

कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२० अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज सोमवारी (दि. 21) अधिकृत प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. सर्वपक्षीय प्रतिनिधी व नागरिकांसमोर पूर्ण पारदर्शीपणे ड्रॉ पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली.

महापालिका निवडणूक आरक्षण सोडतसाठी राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस, अव्वर सचिव अतुल जाधव, कक्ष अधिकारी प्रदीप परब, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची यावेळी उपस्थिती होती.

सोडतीनंतर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना 23 डिसेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. 23 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत हरकती व सूचना देता येतील. ताराबाई पार्कमधील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्‍त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला ६ जानेवारीला सादर केले जाणार आहे.

कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 आरक्षण सोडत

मनपा निवडणूक: सोडत
अनुसुचित जाती प्रवर्ग पुरूष
प्रभाग क्रमांक: ७, ८, २०, ६२, ७९ पुरूष तर १६, १९, ३०, ४०, ६७ ,७५ महिला.

पहिला प्रभाग 40- अनुसूचित महिला
प्रभाग 16 शिवाजी पार्क- अनुसूचित महिला
प्रभाग क्र ४०- अनुसूचित जाती महिला
महिला प्रभाग क्र १९- अनुसूचित जाती

अनुसूचित जाती – ११ प्रभाग आरक्षित
अनुसूचित जाती ( महिला ) – ६ प्रभाग आरक्षित
अनुसूचित जमाती – निरक
नागरिकांचा मागासवर्ग – प्रवर्ग – २२ प्रभाग आरक्षित
नागरिकांचा मागासवर्ग – प्रवर्ग ( महिला ) – ११ प्रभाग आरक्षित
सर्वसाधारण प्रभाग – ४८
सर्वसाधारण प्रभाग ( महिला ) – २४

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button