breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 730 कोरोना रूग्णांची वाढ

कोल्हापूर – काल प्रथमच एक हजारची संख्या ओलांडलेल्या जिल्ह्याला आज काही अंशी दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासांत ७३० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीतांची संख्या २६ हजार ३४४ वर पोहोचली आहे. आजही कोल्हापुर, इंचलकरंजी शहर तसेच हातकणंगले, शिरोळ, करवीर, आजरा आदी तालुका कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरले आहेत.

चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्या ३५९ जणांना घरी सोडण्यात आले आहे.आतापर्यंत एकूण १६ हजार ७८३ कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.शिवाय गेल्या चोवीस तासांत १९ जणांचा व आतापर्यंत ८०४ बाधीतांचा मृत्यू झाला असून सध्या एकूण ८ हजार ७५७ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

या ७३० मध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात उच्चांकी १७७, इंचलकरंजीसह इतर नगरपरिषद क्षेत्रात ८१, हातकणंगले ९०, करवीर ९८, शिरोळ ४५, आजरा ५०, कागल ४४, गडहिंग्लज ३६, भुदरगड २७ आणि पन्हाळा तालुक्यात २४ असे नवे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button