breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये ‘आमचं ठरलयं विकास आघाडी’ या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये ‘आमचं ठरलंय’ दिग्गज पक्षांना भिडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ या पक्षाला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवता येणार आहे. निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणी करुन घेतली आहे.

प्रमोद पाटील हे ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’चे प्रमुख असून गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे ते समर्थक आहेत. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड जागोजागी लावण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button