breaking-newsराष्ट्रिय

कोर्ट कामकाजाचे लाईव्ह प्रक्षेपण होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – कोर्टात चाललेले कामकाज घरबसल्या ऑनलाईन पहाता येण्याची शक्‍यता लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्‍यता आहे. अशी मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानेच ही शक्‍यता सूचित करताना म्हटले आहे की सध्याच्या सुनावणीसाठी कोर्टरूम अपुऱ्या पडत असल्याने खुल्या न्यायालयाची कल्पना राबवण्याची आमचीही इच्छा आहे. न्या दीपक मिश्रा, न्या खानविलकर आणि न्या चंद्रचुड यांच्या खंडपीठापुढे ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली आहे. त्यावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.

तथापी या संकल्पनेला आमचा विरोध नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. पहिल्यांदा ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबवून त्यातील त्रृटी लक्षात घेऊया असा अभिप्राय कोर्टाने दिला आहे. त्यावर ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी कोर्टाला अशी सुचना केली की सुरूवातीला सरन्यायाधिशांच्या पुढे चालणाऱ्या घटनात्मक महत्वाच्या प्रकरणांचे थेट प्रक्षेपण सुरू करता येईल. या प्रयोगाच्या उपयोगितेनंतर पुढील निर्णय घेतला जाऊ शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button