breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांच्या ‘त्या’ भूमिकेचे पडसाद स्थायीत उमटले, राष्ट्रवादीकडून आले बोलावणे

पिंपरी, (महाईन्यूज) – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सदीच्छा भेट देण्याचे प्रकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चांगलेच अंगलट आले आहे. गुरुवारी (दि. 27) पार पडलेल्या स्थायी समितीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आयुक्तांना या प्रकरणाचा खुलासा द्या, अशी मागणी केली, मात्र आयुक्तांनी या विषयावर शांत राहण्याची भूमिका घेतली. त्यांची बाजू सावरण्यासाठी स्थायी सभापतींनी पुढाकार घेऊन या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आयुक्तांना खुलासा मागत निवेदन दिले.

  • पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजप पक्षामार्फत नुकताच सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व संकेत व शिष्टाचार बाजूला करत भाजप कार्यालयात जाऊन बंद दाराआड पालकमंत्र्यांशी ‘गुफ्तगू’ केले. आयुक्तांकडून शिष्टाचाराचा भंग झाला असल्याच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून सर्वच स्तरातून त्याचे पडसाद उमटत आहेत.

आजच्या स्थायी समितीच्या सभेत राष्ट्रवादीचे सदस्य मयुर कलाटे यांनी ‘त्या’ प्रकरणाबद्दल आयुक्त श्रावण हर्डीकर यांना खुलासा मागितला. परंतू, त्यावर आयुक्तांनी कोणतेही उत्तर दिले नाही. उलट स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी यात हस्तक्षेप केला. विलास मडिगेरी म्हणाले की, तुम्ही काल आंदोलन केले आहे. आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना त्याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे तुम्ही आता कशाला विचारणा करत आहात, असे बोलत एकप्रकारे आयुक्तांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. अखेर मयुर कलाटे यांना कोणताच खुलासा मिळाला नाही. तेव्हा संतापलेल्या कलाटे यांनी आमच्याही राष्ट्रवादीच्या कार्यालयास भेट द्यावी, असे निमंत्रणाचे पत्र आयुक्तांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button