breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना संसर्ग; परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती द्यावी

पुणे |महाईन्यूज|

परदेशातून मायदेशी परतलेल्या नागरिकांची माहिती देण्यात यावी, जेणेकरुन कोरोना संसर्ग पसरणार नाही. तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोरराम यांनी केले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे 9 जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी प्रत्येकाने खबरदारी घेण्यात यावी, तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज असून जनजागृतीही करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत गेल्या एक महिन्यापासून परदेशातून आलेले किती नागरिक हॉटेलमध्ये उतरले होते, याची माहिती हॉटेलचालकांनी एका दिवसांत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने माहिती संकलित करण्याचा नमुना तयार केला असून, त्या माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button