breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

कोरोना व्हायरसमुळे एसी, कुलर, फ्रीजच्या किंमतीही वाढल्या…

थंडी संपून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता घरामध्ये एसी, कुलर घेण्याची लगबग सुरू होईल. मात्र यंदा नव्यानं एसी, कुलर, फ्रीज इत्यादी वस्तू घेण्याचा निर्णय घेण जरा खिशाला कात्री देणारा ठरू शकतो…मात्र चांगलाच जाळ लागू शकतो. त्याचं कारण म्हणजे मार्च महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची किंमत वाढवण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. त्याचं कारण म्हणजे जगभरात फोफवणारा कोरोना व्हायरस.

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 2 हजारहून अधिक लोकांचे बळी गेले असून 48 देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त चीन, जपानमध्ये याचं प्रमाण असल्यानं आणि बहुतांश इलेक्ट्रीकल वस्तू किंवा त्याचे भाग हे या देशांमधून आयात केले जातात मात्र त्याचाच मोठा प्रमाणात तुटवडा असल्यानं या किमती वाढण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला ह्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नवीन एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू जास्त महाग होणार आहेत.एलजी, वोल्टास, सॅमसंग, पॅनासोनिक, हायर कंपनी वस्तूंची किंमत वाढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. या कंपनीच्या वस्तुंची किंमत जवळपास 3 ते 4 हजार रुपयांनी वाढणार असल्याचंही म्हटलं जात आहे… तर बजाज कंपनीच्या काही वस्तूंवर ड्युटी चार्जेस वाढवण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button