breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

कोरोना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये दोन आयएएस अधिका-यांची नियुक्ती

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची आकडेवाडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच डाॅक्टर, परिचारिका अन्य कर्मचा-याची संख्या पुरेशी नसल्याने वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊनसह दोन आयएएस अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत टेस्टिंग इन्चार्ज म्हणून आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या चारही अधिकार्‍यांकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा, ग्रामीण आणि कॅन्टोनमेंट हद्दीतील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरासाठी महिला व बालविकास आयुक्त ऋषीकेश यशोद, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले असून अद्याप त्यांना जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.

कोरोना रोखण्यासाठी आयएएस अधिका-याना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्यासोबत महापालिका प्रशासनातील सर्व अधिकारी काम करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button