breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

कोरोना इफेक्ट : पेट्रोल-डिझेलच्या दरात आतापर्यंत ३ रुपयांची घसरण

मुंबई | चीनमधील कोरोना विषाणूचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल घसरल्यामुळे नव्या वर्षामध्ये आतापर्यंत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ३ रुपयांनी कमी झाले आहेत. सोमवारीही दरांमध्ये घसरण होणे सुरूच राहिले. सोमवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर १३ पैशांनी तर डिझेलचे प्रतिलिटर १६ पैशांनी घसरले.

मुंबईमध्ये पेट्रोलचा दर सोमवारी प्रतिलिटर ७७.७६ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रतिलिटर ६८.१९ रुपये इतका आहे. १२ जानेवारीपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले. फेब्रुवारीमध्येच या दोन्ही इंधनांच्या दरात आतापर्यंत प्रतिलिटर एक रुपयाने घसरण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button