breaking-newsताज्या घडामोडीपुणे
कोरोनाविरुद्धचा लढा…सकारात्मक विचाराने लढूया; युवा नेते पार्थ पवार यांचे आवाहन
पुणे । कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे नागरिकांनी ही लढाई सकारात्मक विचाराने लढली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केली आहे.
‘सोशल मीडिया’वर भावना व्यक्त करताना पार्थ पवार म्हणाले आहेत की, नागरिकांनी प्रशासन आणि डॉक्टारांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सकारात्मक दृष्टीकोनातून करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण नकारात्मक विचारांना बाजूला ठेवूया आणि सकारात्मक विचाराने ही लढाई करुया!