breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘कोरोना’वर भन्नाट कल्पना; अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील डायलाॅग पुन्हा चर्चेत

उस्मानाबाद |महाईन्यूज|

देशासह राज्यात कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनाचा वाढता आकडा पाहता सरकारी यंत्रणेकडून लोकांमध्ये कोरोनाची जनजागृती व्हावी म्हणून जाहिरातीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी भन्नाट कल्पना राबवल्या जात आहेत. अशीच एक भन्नाट कल्पना उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा नगरपालिकेने राबविली आहे.

लोहारा नगरपालिकेने एक अनोखे पोस्टर (poster) लावून शहरातील सर्व नागरिकांना घरातच बसण्याचा सल्ला दिला आहे. शहरात लागलेल्या या पोस्टरमध्ये बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाने पकडलं आहे. अस सांगण्यात आल आहे. दरम्यान त्यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांचा फोटो देखील लावला असून, फोटोच्या बाजूला डॉन (don) असं लिहीलं आहे.

लोहारा नगरपालिकेने लावलेल्या सदर पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग देखील वापरला आहे. दरम्यान या पोस्टर मध्ये “ज्या डॉनला पकडणे मुश्कीलच नाही तर नामुमकीन होते, त्याच डॉनला कोरोनानं पकडलंय. तर आपण देखील आपल्या परिवारासोबत घरीच थांबा. उगाच डॉन बनू नका, असं लिहील आहे. याबरोबर कोरोना पासून आपला बचाव कसा करावा आणि कोरोना पासून वाचण्यासाठी काळजी कशी घ्यावी याचीही माहिती पोस्टरमध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचे  लोहारा शहरात लागलेले कोरोना संदर्भात जनजागृती करणारे पोस्टर प्रचंड  व्हायरल झाले आहे. सदर अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टरवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नागरिक अमिताभ बच्चन यांच्या लावलेल्या पोस्टरची थट्टा उडवत आहेत. तर काही नागरिक लोहारा नगरपालिकेचे कौतुक करत आहे. नगरपालिकेचा जनजागृतीचा उद्देश समजून घेऊन नागरिक कौतुक करत आहेत. दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशाला धका बसला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असून सुधारत आहे. अमिताभ बच्चन यांचे  अनेक चाहते महाराष्ट्रासह देशात आहेत. ते देखील अमिताभ बच्चन यांची प्रकृती लवकर सुधारावी, त्यांच्या तब्येतीला आराम पडावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button