breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाला हरवण्यासाठी आजींच्या (वय 80) कुटुंबियांनी दिला ‘रामबाण उपाय’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

अशक्तपणा येऊन घरामध्ये ‘फ्लोअरवर’ कोसळलेल्या 80 वर्षांच्या आजींनी तब्बल दोन तास कसलाच प्रतिसाद दिला नाही. आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाहण्याची तयारी देखील दाखविली नाही. एवढेच नव्हे तर जेव्हा शुध्द आली तेव्हा पाठोपाठ उलट्यांचा त्रास सुरू झाला. वृध्दाप काळातील अशा भयावह स्थितीत मनाला घट्ट करून कुटुंबातील सदस्यांनी जी भूमिका निभावली ती आजींना वरदान ठरली. अशाच प्रकारे कोरोनाबाधित रुग्णांना हाताळल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील, असा प्रेरणादायी संदेश कासारवाडीतील एका आजीच्या मुलाने दिला आहे.

कासारवाडी येथील रहिवासी 80 वर्षांच्या आजी ह्या पुण्यातील ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राचे वरिष्ठ संपादक मनोज मोरे यांच्या मातोश्री आहेत. त्यांना भोवळ आल्याने त्या घरामध्ये ‘फ्लोअरवर’ कोसळल्या. तब्बल दोन तास त्या उठू शकल्या नाहीत. ज्यावेळी त्यांना शुध्द आली, त्यावेळी त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यावर मनोज यांनी तातडीने त्यांना चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी कोविड टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला. कोविड टेस्ट पॉझीटिव्ह आल्यानंतर मनोज आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावली. टेस्ट पॉझीटिव्ह आल्याची माहिती मनोज आणि घरातील सदस्यांनी आईंपासून लपवली. ज्यावेळी आईंनी विचारले तेव्हा मात्र, सुदैवाने टेस्ट निगेटिव्ह आल्याची खोटी माहिती मनोज यांनी सांगितली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजून आईंनी याला फार गांभिर्याने घेतले नाही. त्याचा फायदा आईंना मानसिक दृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी नक्कीच झाला.

उपचार सुरू असताना मनोज यांनी डॉक्टरांना सुध्दा विनंती केली होती. त्यामुळे डॉक्टरांनी सुध्दा आईंना नॉर्मल अजार असल्याचे सांगितले. मनोज आणि घरातील इतर सदस्यांनी कोविड वॉर्डात जाऊन आईंना मानसिक दृष्ट्या वेळोवेळी स्ट्रॉंग करण्यावर भर दिला. त्यांच्याशी गप्पा मारणे, मोबाईलमध्ये सेल्फी काढणे, घरातील अन्य विषयांवर चर्चा करणे अशा अनेक प्रकारच्या युक्त्या लढवून मनोज यांनी आईंना कोरोना या विषयांपासून दूर ठेवले. रुग्णालयात असेपर्यंत मनोज यांनी आईंच्या कानावर कोरोनाचा साधा शब्द देखील पडू दिला नाही. त्यामुळे आईंच्या मनामध्ये कोरोना विषाणुकीची भीती निर्माण झालीच नाही. इतर रुग्णांप्रमाणे त्या दडपणाखाली अजिबात गेल्या नाहीत. दोन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्या सुखरुप घरी पोहोचल्या. डॉक्टरांनी सुध्दा सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे मनोज आईंना सुखरूप घरी आणू शकले. मनोज यांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी योजलेल्या युक्त्या त्यांच्या आईंसाठी वरदान ठरल्या. 80 वय असताना देखील त्या कोरोना विषाणुवर यशस्वी मात करू शकल्या, हाच संदेश यातून समाजातील नागरिकांनी घेतला पाहिजे.

रुग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवा

कोरोनाबाधित रुग्णांना आपणच दडपणात टाकतो. घरातील सदस्य बाधित निघाल्यास त्यांच्या संपर्कात जाण्याचे टाळतो. तसे न करता कोरोना झालेलाच नाही, असे त्याला भासवून दिले पाहिजे. तो घाबरणार नाही. परिणामी, तो दडपणाखाली जाणार नाही. मानसिक दृष्ट्या सक्षम राहिल्यास कोविडबाधित कसलाही रुग्ण बरा होऊ शकतो, याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. मी तो प्रयोग माझ्या घरातील सदस्यावर करून पाहिला. त्यामुळे मी माझ्या 80 वर्षांच्या आईला कोरोनातून मुक्त करून घरी सुखरूप आणू शकलो. नागरिकांनी सुध्दा कोरोनाबाधीत रुग्णांसोबत सलोख्याने वागावे. प्रशासनाने सुध्दा एखाद्याचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आलेला असला तरी त्याला निगेटिव्ह असल्याचे सांगून त्याच्यावर उपचार सुरू करावे. रुग्ण कोणत्याही परिस्थितीत मानसिक दृष्ट्या खचणार नाही, याची खबरदारी घेतल्यास अनेकांचे प्राण वाचती, असे मनोज मोरे यांचे म्हणणे आहे.

https://www.facebook.com/huzare/posts/3105656489546664

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button