breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनाबाधितांची नावे उघड केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार

पुणे | कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची नावे सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी दिला. या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी नागरिकांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी आणि बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्येही त्यांनी कोरोनाबाधितांची नावे जाहीर करू नका, असे आवाहन माध्यमांना आणि सामान्य नागरिकांना केले होते. कोरोनाबाधितांची नावे उघड केल्यास सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही जणांकडून या रुग्णांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर सामाजिक बहिष्कार घातला जाऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची नावे उघड केली जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले होते. कोरोना व्हायरसची लागण हा काही गुन्हा नाही. तो केवळ विषाणूद्वारे होणारा आजार आहे, असेही ते म्हणाले होते.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बुधवारी रात्रीपर्यंत आठवर जाऊन पोहोचली होती. सोमवारी रात्री सर्वात आधी पुण्यात दोघांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी काही जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे रुग्ण कुठे राहतात, त्यांची नावे काय आहेत, हे जाहीर करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवसापासून कोरोनाबाधितांची नावे उघड करू नये, असे आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button