breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

कोरोनाच्या संकटामुळे मयूरेश्वर आणि रांजणगावच्या गणपतीची भाद्रपद यात्रा रद्द

बारामती – कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मोरगावच्या मयूरेश्वर मंदिरातील भाद्रपद यात्रा रद्द मंदिरातील भाद्रपद यात्रा रद्द करण्यात आली तसेच श्री रांजणगाव गणपती देवस्थानची भाद्रपद यात्रा साजरा न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

रांजणगाव आणि मोरगांव येथील भाद्रपद यात्रा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतीपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी दरम्यान साजरा करण्यात येतो. यात्रा काळात दरवर्षी सर्व धर्मीयांना मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने श्रींचा मुख्य गाभारा खुला करण्यात येतो. मात्र कोरोना महामारी वाढत्या फैलावामुळे रांजणगाव आणि मयुरेश्वर मंदिर बंद आहे. मयुरेश्वर आणि रांजणगाव गणपती हे अष्टविनायकातील महत्त्वाचे स्थान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button