breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अेनक कार्यक्रम आणि सण हे रद्द करण्यात आलेत किंवा पुढे ढकलण्यात आले आहेत..मग त्यात पावसाळी अधिवेशन का असेना..कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाविकास आघाडी सरकारला पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन आठवड्यापूर्वीच गुंडाळावे लागलं होतं. तसेच जुलै महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्ट रोजी पार पडणार होते. मात्र, मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशावेळी विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्य मुंबईत येणे किंवा त्यांची राहण्याची सोय तसेच या आमदारांच्या स्टाफची व्यवस्था होणे कठीण आहे. यामुळे 3 ऑगस्ट रोजी विधिमंडळाचे पहिले पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हे अधिवेशन सप्टेंबर महिन्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या काळात विधानभवनात लोक गर्दी करतात. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो. तसेच प्रशासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी विधानभवनात असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतक्या लोकांनी एकत्र येणं धोकादायक ठरेल. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरसकट सगळे आमदार बोलवण्याऐवजी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे येथील लोकप्रतिनिधींना बोलवून सभागृहाचे कामकाज चालवावे, या पर्यायाचा सरकारकडून विचार सुरु होता. मात्र यावर विरोधी पक्षाने आक्षेप नोंदवला. अधिवेशन कमीत कमी सदस्य संख्येत व्हावं, या प्रस्तास्वला आमचा विरोध होता. हे संविधानात बसणार नाही. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button